26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात शनिवारपासून हुडहुडी

राज्यात शनिवारपासून हुडहुडी

दोन डिसेंबरपासूनतापमानात घट; थंडी वाढण्याची शक्यता

पुणे : राज्याच्या बहुतेक भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण हळूहळू कमी होऊन, शनिवारी, दोन डिसेंबरपासून राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून येणारी वा-याची द्रोणीय रेषा उत्तर केरळ ते उत्तर मध्य महाराष्ट्रावर आहे, तसेच पश्चिमेकडून येणा-या थंड वा-याचा परिणाम राज्याच्या उत्तर भागावर दिसून येत आहे. ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वा-याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय बंगालच्या खाडीत अतीतीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याचे शनिवार, दोन डिंसेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

या सर्व वातावरणीय प्रणालींचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. शनिवार, दोन डिसेंबरपासून ढगाळ हवामान कमी होऊन राज्यात थंडी जाणवू लागेल. पश्चिमेकडील थंड वा-याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी लवकर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद १४.६ अंश सेल्सिअस इतकी महाबळेश्वर येथे झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR