26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

आवक सुरूच

छ. संभाजीनगर : न्यायालयाच्या आदेशानंतर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारपासून हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या ४३.६७ टक्के एवढा झाला आहे. तर, आज सकाळी ६ वाजेदरम्यान २० वीस हजार ६०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढा-यांनी थेट विरोध केला. त्यामुळे मराठवाड्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलनं झाली.

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केले. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने देखील पाणी सोडण्यास स्थगिती दिली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्याला मोठ्या संघर्षानंतर पाणी मिळाले आहे. विशेष म्हणजे यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, पिकांना जीवनदान मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR