21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रप्रचारात सहभागी झाल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई!

प्रचारात सहभागी झाल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई!

परिपत्रक जारी, विद्यापीठ, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांना निर्देश

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी राजकीय पक्षांच्­या निवडणूक प्रचारात प्रत्­यक्ष किंवा अप्रत्­यक्ष सहभाग घेतल्­यास त्­यांच्­यावर शिस्­तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्­थांना दिले आहेत.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सध्या राज्­यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्­यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्­यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी, कर्मचा-यांसाठी सामाईक परिनियम अस्तित्­वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू करण्यात आलेल्­या आहेत.

त्­यानुसार कोणत्­याही शासकीय कर्मचा-याला कोणत्­याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणा-या कोणत्­याही संघटनेचा सदस्­य होता येणार नाही, त्­यांच्­याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्­याही राजकीय चळवळीत किंवा कामात कोणत्­याही प्रकारे भाग घेता येणार नाही अथवा सहाय्य करता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

कोणताही कर्मचारी विधानसभेच्­या किंवा स्­थानिक प्राधिकरणाच्­या निवडणुकीत प्रचार करु शकणार नाही, हस्­तक्षेप करु शकणार नाही, त्­यासंबंधी आपले वजन खर्च करु शकणार नाही किंवा त्­यात भाग घेऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक कामात किंवा प्रचार कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न
निवडणुकीत मतदानाचा टक्­का वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यात महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना मतदान करण्याच्­या दृष्टीने प्रोत्­साहित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. नवमतदारांसोबत इतर मतदारांनाही जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करतानाच जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR