20.1 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना पगारी सुटी

मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना पगारी सुटी

नियम मोडणा-यांवर होणार कारवाई

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुटी असणार आहे.

मुंबईत २० नोव्हेंबर रोजी कामगारांना पगारी सुटी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे पालन न करणा-या संस्थाविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मुंबईत बुधवार, २० नोव्हेंबर रोजी अनिवार्य सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रक काढून ही घोषणा केली. मतदानाच्या दिवशी सुटीसाठी पगार कपातीची परवानगी नसणार आहे. तसेच नियम न पाळणा-या संस्थाच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे.

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन्स, उपक्रम संस्था, औद्योगिक गट, व्यापारी इतर सर्व आस्थापने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा देणे बंधनकारक आहे असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासोबत अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची रजा मंजूर करणे शक्य नसेल, तर कर्मचा-यांना किमान चार तासांची सूट दिली जाऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR