22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला राजु शेट्टीचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला राजु शेट्टीचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळी समीकरणे बनू लागली आहेत. कुठे मनसे अजित पवारांच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देतेय, तर कुठे भाजपा मनसेच्या उमेदवाराला पांिठबा देतेय. कुठे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार माघार घेतोय तर कुठे काँग्रेसला बदललेल्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा लागत आहे. कोल्हापूर पट्ट्यात राजकारण कसे कसे फिरू लागले आहे याचा प्रत्यय राज्याच्या राजकारण्यांना येऊ लागला आहे. राजू शेट्टींनी तर आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.

राजू शेट्टींनी लोकसभेच्या आपल्या विरोधकालाच विधानसभेला पाठिंबा जाहीर करून टाकला आहे. ठाकरे गटाचे मविआचे शाहुवाडी मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील यांनी आज शेट्टींची भेट घेतली. यावेळी शेट्टी यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. पाटील हे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. राजू शेट्टी आणि कोरे यांच्यातून विस्तवही जात नाही. यामुळे राजू शेट्टी यांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

राजू शेट्टी यांचा पाठिंबा मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता या मतदारसंघापुरती मविआच्या पाठीशी राहणार आहे. लोकसभेला शेट्टी यांनी मविआकडून उमेदवारी मिळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. परंतू, चर्चा फिस्कटल्याने ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करून शेट्टी यांना वेगळे लढण्यासाठी भाग पाडले होते. हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR