27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रखोतांनी, राजकारणावर बोलावे पण व्यंगावर नको

खोतांनी, राजकारणावर बोलावे पण व्यंगावर नको

नाशिक : प्रतिनिधी
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य मला अजिबात आवडलेले नाही. राजकारणावर बोलावे पण व्यंगावर बोलू नये. मला त्याचे दु:ख झाल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे होऊ नये. त्यांची चूक झाली, पण त्यांचे असे वक्तव्य नको होते असेही भुजबळ म्हणाले.

येवला मतदारसंघ कार्यकर्ते सांभाळत आहेत. तुम्ही येवल्यात प्रचारात दिसत नाही, याबाबत देखील भुजबळ यांना यावेळी विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, मला फक्त नारळ फोडायला बोलवलं होतं. कार्यकर्ते सांभाळत आहेत. मी राज्यातील प्रश्नांवर काम करत असल्याचे भुजबळ म्हणाले. लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्हाला होईल. लाडकी बहीण योजनेबाबतही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधक बोलत होते की या योजनेमुळे अर्थशास्त्र बिघडले.

पण आता विरोधकच १५०० रुपयांचे ३००० रुपये करत आहेत. लोकांना आता कोणी आश्वासन देते, त्यापेक्षा पदरात किती पडते हे महत्त्वाचे आहे. आम्ही सर्वांसाठी ही योजना लागू केली आहे. आम्हाला त्याचा फायदा जास्त होईल अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली. लाल संविधान रंगाच्या मुद्यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ही राज्याची निवडणूक आहे. संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR