20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeसोलापूरकार्तिकी यात्रेसाठी आठ लाख बुंदी लाडू प्रसाद

कार्तिकी यात्रेसाठी आठ लाख बुंदी लाडू प्रसाद

पंढरपूर : माघी, चैत्र, आषाढी व कार्तिकी अश्वीन या चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साज-या करण्यात येतात. यामध्ये कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना ‘श्रीं’चा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर बूंदी व राजगिरा लाडू श्रीं चा प्रसद म्हणून खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल यादृष्टीने आठ लाख बूंदी लाडू प्रसाद व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवणात येत आहे.

यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बूंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करुन प्रति पाकीट २० रुपयांप्रमाणे व २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट १० रुपयांप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, संत तुकाराम भवन असे खरेदी करता एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल २४ तास खुले ठेवण्यात येत आहेत. या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेत खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे.

बुंदी व लाडू प्रसाद विक्रीची जबाबदारी अनुभवी विभागप्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे. याशिवाय सुमारे ९० कर्मचारी २४ तास परिश्रम घेत असल्याचे मनोज श्रोत्री यांनी सांगितले. एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाईंड तेल, बेदाणा, विलायची या सुकामेव्यांच्यापासून अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रसाद तयार करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR