27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीपिंपरी देशमुख खून प्रकरणात एका आरोपीला अटक

पिंपरी देशमुख खून प्रकरणात एका आरोपीला अटक

परभणी : पार्टी करायला जावू असे म्हणून परभणी शहरातील भोई गल्लीतील एका तरूणास घरातून सोबत घेवून गेल्यानंतर या युवकाचा क्षुल्लक कारणावरून खून करण्यात आल्याची घटना दि.७ रोजी रात्री ९.३० ते पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान पिंपरी देशमुख शिवारातील आखाड्यावर घडली होती.

या प्रकरणी ६ आरोपी विरूध्द ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी शेत मालक लक्ष्मण शितळे यास पकडून परभणी न्यायालयात हजर केले असता आरोपीस सोमवार, दि.११ रोजी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांनी दिली आहे.

या प्रकरणी खून झालेल्या युवकाची आई गोदावरी भ्र. लक्ष्मण आडणे (वय ४८) रा. भोई गल्ली, इदरूका मस्जीद जनता मार्केट परभणी यांनी फिर्यादी दिली आहे. या फिर्यादी नुसार फियार्दी हिचा मुलगा सचिन पि. लक्ष्मण आडणे (वय २५) यास आरोपी अजिंक्य जगताप, प्रितम देशमुख, अलकेश देशमुख, मुंजा कहाते, रा. पिंपरी देशमुख, नवनाथ शिंदे रा. गंगाखेड हे पार्टी करायला जाउ असे म्हणुन घरून घेवून गेले व आरोपी क्र. ६ लक्ष्मण शितळे पिंपरी देशमुख शिवारातील रा. पिंपरी देशमुख यांचे शेतातील आखाड्यावर संगणमत करून सचिन याला हातावर, पायावर, मांडीवर, पोटावर, डोक्यावर चाकुने, लाकडाने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून जिवे ठार मारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे, ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, आप्पाराव व-हाडे, रामकिसन काळे, संतोष चाटे, एलसीबीचे भारती यांनी भेट धेवून पाहणी केली होती. तसेच आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती. या प्रकरणी पोउपनि काठेवाडे यांनी आरोपी अजिंक्य जगताप, प्रितम देशमुख, अलकेश देशमुख, मुंजा कहाते, नवनाथ शिंदे, लक्ष्मण शितळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि मोरे यांचेकडे आहे. दरम्यान या घटनेतील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास सोमवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार मोरे यांनी दिली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR