26.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्रांवर मोबाइलबंदी विरोधात हायकोर्टात याचिका

मतदान केंद्रांवर मोबाइलबंदी विरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उजाला शामबिहारी यादव यांनी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल आणण्याची आणि डिजिलॉकद्वारे ओळखपत्र सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. ‘डिजिलॉक अ‍ॅप’ला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

मोबाइलवर बंदी घातल्याने ओळखपत्रासाठी डिजिलॉकवर अवलंबून असलेल्या मतदारांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे या उद्देशासाठी मतदारांना मोबाइल फोन वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने १४ जून २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील संदिग्धतेच्या संदर्भात अ‍ॅड. जगदिश सिंह यांच्यामार्फत यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR