29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रआमचे घड्याळ चोरीला गेलेय

आमचे घड्याळ चोरीला गेलेय

कात्रज : प्रतिनिधी
आमचे घड्याळ चोरीला गेले आहे, त्यामुळे तुतारीला मतदान करा आणि आमचे सरकार आणा त्यानंतरच पुण्याचे ट्रॅफिक, खड्डे, पाणी यासारख्या समस्या सुटतील आणि शहराची कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रज येथे सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी जबाबदरी उत्तम पार पाडली आहे. प्रशांत जगताप असे कार्यकर्ते आहेत जे एकनिष्ठ राहिले. ते ठामपणे निर्णय घेत साहेबांसोबत राहिले. लोकसभेला चांगले काम केले. अशा कार्यकर्त्यांमुळे आम्ही लोकसभेला चांगले यश मिळवले.

प्रशांत जगताप म्हणाले, हडपसरचे भवितव्य आपल्याला ठरवायचे आहे. मागील आमदारांनी काय दिले याचे पोस्टमार्टेम करायची वेळ आता आली आहे. यांनी कात्रजचा काय विकास केला, हडपसरचा काय विकास केला. मागील आमदार कोविडमध्ये कोठे होते, घरात की वॉर्डात.. याचा जाब तुम्ही विचारा, मागच्या आमदारांनी काय केले, याचा सवाल तुम्ही विचारा. आमदारांनी या ठिकाणी हॉस्पिटल, गार्डन यापैकी काही आणलं असतं तर तो विकास होता; पण त्यांनी विकास केला नाही. यावेळी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वसंत चौगुले व इतरांनी पक्षात प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR