जिंतूर : तालुक्यातील मौजे मांडवा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा माजी आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.३० नोव्हेंबर रोजी जनसंपर्क कार्यालय येलदरी रोड जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
यात मांडवा येथील उपसरपंच नागोबा कोकाटे, कुंडलिक कोकाटे, अप्पा गुहाडे, अंजाजी घोगरे, नारयण शेळके, लक्ष्मण लिंबाळकर, अंजाजी गायकवाड, बाजीराव क-हाळे, सोनाजी भिसे, भिवाजी गायकवाड, रमेश बोडखे, नवनाथ कोकाटे, कुंडलिक कोकाटे, किशन कोकाटे ई.नी भाजपची ध्येय धोरणे व जिंतूर येथील अकार्यक्षम नेतृत्व यांना कंटाळून माजी आ.भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आ.भांबळे यांनी सर्वांचे हार व पक्षाचा रुमाल घालून पक्षात स्वागत केले व पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकतीने कामास लागून पक्षाचे विचार व विकास तळागळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
यावेळी विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, गणेशराव इलग, माधव घोगरे, माऊली घुगे इटोलीकर, बालाजी सांगळे, मनोज तोडकर, प्रवीण चव्हाण, अश्रोबा चव्हाण, हरिराम शिंदे, ज्ञानेश्वर राठोड, सीताराम चव्हाण ई उपस्थित होते.