23.3 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरऊबदार कपड्यांच्या किंमती ३० टक्क्यांनी वाढल्या

ऊबदार कपड्यांच्या किंमती ३० टक्क्यांनी वाढल्या

लातूर : सिध्देश्वर दाताळ
नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच शहरात हवेतील गारवा वाढल्याने येत्या काही दिवसातच थंडीच्या आगमनाचा इशारा हवामानाने दिला आहे. यामुळे थंडीची चाहूल लागताच शहरातील बाजारात थंडीचे उबदार कपडे दिसू लागले आहेत. मात्र इतर वस्तूच्या बरोबर उबदार कपडयांनाही महागाईचा तडाखा बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उबदार कपडयांच्या किंमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे यंदा नागरिकांना उबदार कपडयांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.
हवेतील गारवा वाढत असताना बाजारात वेगवेगळया प्रकारचे रंगीबेरंगी स्वेटर, जॅकेट, कानटोप्या, मफरल दाखल होत बाजारपेठा थंडीच्या मोसमाच्या आधारे सजू लागल्या आहेत. यात स्वेटर बरोबर बॉडी वॉर्मरचा ट्रेंड दिसून येत आहे. याच धर्तीवर शॉल, वूलन सॉक्स, स्लव्हिलेस जॅकेट, लेदर जॅकेट, हुडी, लहान मुलांसाठी कमी वजनाचे स्वेटर, हुडीज सुद्धा बाजारात आल्या आहेत. यात झिपर आणि हुडीची खरेदीसाठी तरुणाईने पसंती दर्शवली आहे. बाजारात या वर्षी नागरिकांसाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याने उबदार कपडयाची मागणी वाढल्याचे व्यापरी आजीम शेख यांनी सांगितले. काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात रात्री गारवा अंगाला झोंबत असल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडयाचा आधार घेत आहेत.
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील जुने रेल्वे स्टेशन शेजारी तर डॉ. बाबासाहेब आबेंडकर पार्क येथे गेल्या महिनाभरापासून परप्रांतीय विक्रेत्यांनी उबदार  कपड्यांचे स्टॉल्स थाटले असून या स्टॉलवर १५० रूपयांपासून ते १८०० रूपयांपर्यत उबदार कपडे उपल्बध असून स्वेटर, जॅकेट, कानटोपी, कानपट्टी या कपडयाला जास्तीची मागणी होत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR