37.1 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेतील सरकारी नोक-यांमध्ये होणार कपात

अमेरिकेतील सरकारी नोक-यांमध्ये होणार कपात

रामास्वामींकडून संकेत

वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योजक ते यशस्वी राजकारणी, असा प्रवास करणारे भारतवंशीय विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील सरकारी नोक-यांत मोठी कपात करण्याचे संकेत दिले. देशाला वाचवण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट करत लाखो कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्याचे नियोजन सुरू असल्याचे रामास्वामी यांनी सांगितले.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्यासोबत रामास्वामी यांना सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. फ्लोरिडातील ‘मार-ए-लागो’ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामास्वामी यांनी कपातीसंदर्भात भाष्य केले. मी व इलॉन मस्क आम्ही दोघे सध्या अशा स्थितीत आहोत की, लाखो न निवडलेल्या केंद्रीय नोकरशाहांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

आम्ही अशा प्रकारच्या उपाययोजना करून देशाला वाचवू. देशाची वाटचाल -हासाकडे सुरू असल्याचे आपल्यावर बिंबवण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR