16.1 C
Latur
Tuesday, November 19, 2024
Homeमहाराष्ट्रसोन्यात किंचित उसळी, चांदीची घसरगुंडी

सोन्यात किंचित उसळी, चांदीची घसरगुंडी

मुंबई : या आठवड्यात सोन्याने मोठी उसळी घेतली. तर चांदीने नरमाईचा सूर आळवला. गेल्या १५ दिवसांत सोने ६ हजारांच्या घरात तर चांदी ११ हजारांनी स्वस्त झाली होती. गेल्या आठवड्यात सोन्यात १३०० रुपयांची तर चांदीत ५ हजारांची घसरण नोंदवण्यात आली.

सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने सराफा बाजारात मोठी गर्दी उसळली. जागतिक बाजारात अमेरिकेतील सत्ता बदलाचा परिणाम दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प लवकरच व्यापारी धोरणात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आता दिसून येईल. या आठवड्यात सोन्याने ६०० रुपयांची झेप घेतली तर चांदीत कुठलाही बदल दिसला नाही.

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत १३०० रुपयांनी उतरली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने ६६० रुपयांनी महागले. सोमवारी सोन्याने उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा मौल्यवान धातुत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७०,०१० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७६,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण
गेल्या दोन आठवड्यात चांदीला मोठी मजल मारता आली नाही. चांदी गेल्या आठवड्यात ५ हजार रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ८९,५०० रुपये इतका आहे.

१४ ते २४ कॅरेटचा दर काय?
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोने ७४,८०८, २३ कॅरेट ७४,५०८, २२ कॅरेट सोने ६८,५२४ रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ५६,१०६ रुपये, १४ कॅरेट सोने ४३,७६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८९,२८९ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR