लातूर : प्रतिनिधी
महारा्ष्ट्र विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया दि. २० नोव्हेंबर रोजी पार पडली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्यासह देशमुख कुटूंबियांनी बाभळगाव मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
बाभळगाव येथील मतदान केंद्रावर विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, सौ. अदिती अमित देशमुख, सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख, सौ. जेनिलीया रितेश देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांही मतदानाचा हक्क बजावला.