19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeनांदेडलोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक

लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक

नांदेड : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे घडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकारामुळे येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. काही मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया अजून सुरु आहे. याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी सुरु असतानाच केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये वाद होऊन एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

मतदान केंद्राबाहेर दोन गटात तूफान दगडफेक झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान दगडफेक करणा-या जमावाला पोलिसांनी पांगविले असून याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवला असून लोहा येथे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR