लातूर : प्रतिनिधी
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असले तरी वाढत्या वापराचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. विशषेत: तरुणांमध्ये मोबाईल, सोशल मीडियाचे व्यसन वाढत आहे. त्यातून चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढला आहे. परिणामी, युवकांचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा योग्य आणि आवशयक तेवढा वापर करणे आवश्यक आहे.
कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊ या, असे यंदाचे ब्रीद वाक्य जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जाहीर करण्यात आले आहे.शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु, तो अनेकदा दुर्लक्षित होतो. कोविड कालावधीत लॉकडाऊन झाल्याने एकाकीपणा वाढला होता. त्यातून मानसिक तणाव, व्यसनाधीनता, नैराश्याच्या समस्या वाढत आहेत. नैराश्य ही जुनी आणि ज्ञात मानसिक आरोग्य समस्या आहे. दिवसेंदिवस नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र नागरिांना या समस्येची पूर्णपणे माहिती नाही.
या संदर्भात जागरुकतेसोबतच समुपदेशन, औषधोपचार महत्वाचे आहेत. तसेच आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मानसिक आजार वाढत ओहत. या संदर्भात समाजात जागरुकता होणे आवश्यक आहे. तसेच मानसिक आरोग्य शिक्षण, नियमित तपासण्या आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास हा आजार लवकर बरा होतो अथवा त्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.