लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील ट्यूशन एरिया म्हणून ओळखल्या जाणा-या भागात हॉस्टेलवर राहणा-या बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाकडून देशी कट्टा (रिव्हॉल्वर) जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरातील ट्यूशन एरियातील एका हॉस्टेलवर बीड जिल्ह्यातील एक तरूण भाड्याने राहत होता. पोलिसांनी त्याच्या रूमची झडती घेतली असता त्यांना त्याच्याकडे जुने वापरातील एक देशी कट्टा (रिव्हॉल्वर) आढळून आले. अधिक चौकशी करता हा कट्टा गणेश शेंडगे रा. एलआयसी कॉलनी लातूर याचा असून त्याने माझ्याकडे ठेवण्यासाठी दिला आहे असे त्या अल्पवयीन मुलाने सांगितले. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक हनुमंत कवले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४६४/२०२४ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.
पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला ताब्यात घेतले आहे तर अल्पवयीन मुलास त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे व लातूर शहर चे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले, पोलीस अमलदार रणजीत शिंदे, बालाजी कोतवाड, अमित लहाने, काकासाहेब बोचरे, सोनवणे यांनी केली आहे.