26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरकापूस वेचणीचे दर वधारल्याने शेतक-यांत चिंता

कापूस वेचणीचे दर वधारल्याने शेतक-यांत चिंता

जळकोट : प्रतिनिधी
कापूस हे शेतक-यांचे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात. यंदा बाहेरील मजूर कापूसवेचणीला आले नाहीत; त्यामुळे लाखमोलाचे पांढरे सोने मजुरांअभावी शेतातच असून, मजूर मिळत नसल्याने शेतक-यांचीचिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधत फिरताना दिसत आहेत.
कापूस उत्पादक शेतक-यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरीविरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादनखर्च अधिक व उत्पादन कमी अशी शेतक-याची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकीने शेतक-यांंवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. कापूस वेचणीला आला मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणी आला आहे.
कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरुवाती- पासून शेतक-यांना कापूस पिकावर जास्त खर्च करावा लागतो. त्या तुलनेत कापूस शेतक-यांना परवडत नाही. यंदा कापूसवेचणी करायला मजूर मिळत नसल्याने १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी करावी लागत आहेकिंवा बाहेरून ऑटोने मजूर आणून कापूसवेचणी करावी लागत  आहे.  सध्या ढगाळ वातावरण आहे  यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे . झाडावरच तो मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या शेत कापसाचे पांढरे रान झाल्याची स्थिती तालुक्यात दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR