21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरपोलिस उपनिरीक्षक रजपूत अँटी करप्शनच्या जाळयात

पोलिस उपनिरीक्षक रजपूत अँटी करप्शनच्या जाळयात

सोलापूर (प्रतिनिधी) गुन्ह्याच्या तपासातील आरोपीवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या नावाने १ लाख रूपयांची लाच स्विकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु सुरू असल्याचे एसीबी कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रतापंिसग रजपूत, तक्रारदार यांचे मित्र यांचेवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पीएसआय विक्रम रजपूत यांनी त्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांचेवर यापूर्वीही अ‍ॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून,त्यांचेवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी स्वता:साठी व पोनि राजन माने यांचे नावे म्हणून २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती १ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने, पीएसआय विक्रम रजपुत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे,पोना श्रीराम घुगे,पोना अतुल घाडगे,पोना संतोष नरोटे,पोना स्वामीराव जाधव, पोशि गजानन किणगी, चापोशि शाम सुरवसे (सर्व नेमणुक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो,सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR