25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeसोलापूरगुटखा, मावा राजरोस विक्री बंदी असूनही परराज्यांतून आवक

गुटखा, मावा राजरोस विक्री बंदी असूनही परराज्यांतून आवक

सोलापूर : सुंगधी तंबाखूसारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्रीस व बाळगण्यास बंदी असतानाही, सोलापूर शहर-जिल्ह्यात परराज्यातून गुटखा, सुंगधी तैवाखूसारखे पदार्थ हुप्या पद्धतीने येत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून तसेच औषध प्रशासनाकडून गुटखा कारवाई करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला जात असला, तरी शहरातील पान पन्यांवर मावा गुटखा सहजच उपलब्ध होत आहे.

तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असून त्यामुळे जीवघेणे आजारही उ‌द्भवतात. त्यामुळे तरूणांना व्यसनापासून दूर ठेऊन सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारू, गुटखा, मावा आदींच्या विक्रिवर कडक निर्बंध आहेत. मात्र सरकारी यंत्रणाच्या दुर्लक्षामुळे आणि काही सरकारी लोकांच्या आश्रयाने हे अवैध व्यवसाय चालत असतात. गुटखाबंदी नसलेल्या अन्य राज्यातून तस्करी करून विविध वाहनांतून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रिसाठी आणले जात असल्याचे पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या कारवायांवरून दिसून आले आहे.

परराज्यातून तस्करी करून आणलेला गुटखा, सुगंधी तंबाखूची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधीच्या घरात असल्याचे बोलले जाते. शहरात अंमली पदार्थ खरेदी-विक्रीमध्ये वाढ होत असल्याने शहर या व्यसनांपासून मुक्त कधी होणार असा प्रश्न नागरीकांमधून विचारला जात आहे. राज्याच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतनाही गुटखा राज्यात येतोच कसा असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोलापूर शहरातील अनेक परिसरातील पान टपऱ्यांमध्ये गुटखा, मावा खुलेआम पणे विकला जात आहे.शहरातील मोदी पोलिस चौकी, बेगम पेठ पोलिस चौकी, किडवाई चौककुंभार वेस, जोडबसवण्णा चौक, ७० फुट रोड, अशोक चौक अशा ठिकाणी तर केवळ मावा विक्रिची ठिकाणे प्रसिध्द आहेतयाठिकाणी मावा खरेदीसाठी अक्षरशः शौकीनांची मोठी गर्दी पहावयास मिळतेठराविक ठिकाणीच घेतलेला मावा खाल्याशिवाय किक्च बसत नाही, असे अनेकांचे म्हणणे असल्यामुळे ही गर्दी पडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशासनाकडून या मावा विक्रिच्या ठिकाणांवर कारवाई करून यातील पदार्थांची तपासणी करावी, अशी मागणी नागरीकांम धून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR