मोहोळ : महाराष्ट्र कामगार कल्याण नोंदणी झाल्यानंतर त्या कामगारांना गृहोपयोगी साहित्यासह लग्नकार्य, प्रसूती, शिक्षणासह इतर कारणांसाठी आर्थिक मदत दिली जाते. हा लाभमिळविण्यासाठी मोहोळच्या कार्यालयात बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. ती नोंदणी थांबविण्याबाबत संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
स्वत:च्या विवाहासाठी गृहोपयोगी भांडी, मुलीच्या विवाहासाठी, पत्नीच्या प्रसूतीसाठी, प्रसूतीमधील सिझरिंगसाठी, गंभीर आजारांवरील उपचारासाठी, अपंगत्व आल्यास व व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी या माध्यमातून मदत केली जाते. पहिली ते अभियांत्रिकीपर्यंतच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात. कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू झाल्यासही मदत दिली जाते.
बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मदत केली जाते. याशिवाय त्याच्या विधवा पत्नीस प्रतिवर्षी २४ हजार रुपये पाच वर्षांपर्यंत मिळतात. अशा या सर्व योजनांचा लाभ कामगार नोंदणी झाल्यानंतर दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार नसतानाही बोगस कामगार आहे, अशी नोंदणी केली जात आहे.
चांगल्या घराण्यातील महिला व पुरुषांनी कामगार नोंदणी करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चांगल्या घराण्यातील व्यक्तींची नोंदणी कामगार म्हणून केली जात आहे. पण ख-याअथनि जे कामगार आहेत ते मात्र नोंदणी प्रक्रियेपासून अलिप्त राहात असल्याचे दिसून येते.
शासकीय नियमानुसार संबंधित कामगारांना भांडी दिली जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आहे.भांड्याची किंमत बाजारात तीन हजार रुपये आणि कामगार कल्याण मंडळ कत्राटदारांना आठ हजार ५०० रुपये त्यासाठी देते.असे बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी यांनी सांगीतले.
अधिका-यांनी फिल्डवर जाऊन त्या कामगारांचा कामावरच फोटो काढायचा आहे व त्याठिकाणीच सर्व त्यांची कागदपत्रे घ्यायची आहेत. पण हेच अधिकारी नियमाचे पालन करत नाहीत. त्यामुळे सध्या बोगस कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी लागणारे वयाचे पुरावे, ९० दिवसाााकाम केल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बैंक ,पासबुक, रहिवासी पुरावा द्यावा लागतो. परंतु तसे न करता एजंटांना दीड ते दोन हजार रुपये दिले की कामगार नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी एजंटांनी दुकाने थाटली आहेत.
मोहोळ तालुक्यात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे खरा कामगार हा शासनाच्या लाभापासून वंचित राहात आहे. त्यामुळे संबंधित अधिकां-यावर कारवाई करावी.अशी नागरीकांची मागणी आहे.