नागपूर : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशन आजपासून २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे. फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात २० विधेयके मांडले जाण्याची शक्यता आहे. संख्याबळाअभावी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळविणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे. दरम्यान, विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले आहे. उद्या मंगळवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू होणार आहे.
दरम्यान, सभापती नीलिमा गो-हे यांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा तसेच माजी विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनावर सभापती नीलिमा गो-हे यांनी सर्वांचावतीने आदरांजली वाहिली. तसेच शोक प्रस्ताव पारित करुन सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.
विरोधकांचे ईव्हीएमविरोधात आंदोलन
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची सभागृहाला ग्वाही दिली. विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे.
विरोधकांची ‘ईव्हीएम हटाव’ची घोषणाबाजी
विधानसभेच्या अधिवेशनात उर्वरित आर्थिक वर्षासाठी (मार्चपर्यंत) आवश्यक असणा-या अतिरिक्त खर्चावर, सत्ताधारी- विरोधी पक्षांच्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी ‘पुरवणी मागणी’ यावर चर्चा होणार आहे.
महायुती आघाडीतील ३९ नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. येत्या दोन दिवसांत मंर्त्यांना खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
प्रथमच विरोक्षी पक्षनेतेपद नाही
गेल्या ५२ वर्षात (१९७२ ते २०२४) प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड होण्यासाठी विरोधी पक्षांकडं पुरेस संख्याबळ नाही. राज्य विधिमंडळ कायद्यानुसार विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या (२८८) १० टक्के म्हणजे २९ एवढे संख्याबळ हवे असते. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) या तीनही पक्षांकडे प्रत्येकी आमदारांची संख्या २९ हून कमी आहे.