20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रबिस्किटमध्ये किडे-अळ्या

बिस्किटमध्ये किडे-अळ्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार

बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूरमध्ये नामांकित कंपन्यांच्या बिस्किटांमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. एक्सपायरी डेट झालेली नसतानाही बिस्किटात किडे आणि अळ्या आढळल्या आहेत. दुकानदाराने कंपनीकडे बोट दाखवत हात वर केले आहे. बदलापूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हे बिस्किटे एका चिमुकलीने खाल्ल्याने पालक चिंतेत असून दुकानदाराने कंपनीकडे बोट दाखवत हात वर केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

बदलापूरच्या बेलवली परिसरात राहणा-या कृष्णा गोस्वामी यांनी मुलींसाठी परिसरातल्याच एका दुकानातून नामांकित कंपनीचे बिस्कीट पुडे विकत घेतले होते. या बिस्किटांवर एप्रिल २०२५ ची एक्सपायरी डेट आहे. घरी गेल्यावर त्यांच्या मोठ्या मुलीने चार बिस्किटे खाल्ली आणि ती शाळेत गेली. तर लहान मुलीला बिस्किटं देत असताना त्यात किडे असल्याचे गोस्वामींच्या लक्षात आलं. दुकानदाराला दाखवल्यानंतर त्याने कंपनीकडे बोट करत हात वर केले.

बिस्किटामध्ये किडे-अळ्या आढळल्याचे समोर आल्यानंतर संबंधित दुकानदाराला ही बाब दाखवली. दुकानदाराने बिस्किटांची एक्सपायरी डेट झालेली नसल्याचं सांगत कंपनीकडे बोट दाखवलं. याबाबत डीलर आणि कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क साधला, पण ग्राहकांना कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधायला सांगा असे उत्तर कंपनीच्या अधिका-याने दिलं. या प्रकारामुळे बदलापूरमध्ये संतापाचे वातावरण आहे. या सगळ्या प्रकारानंतर गोस्वामी यांनी संताप व्यक्त केला. कुणीही जबाबदारी घ्यायला नसून अशा प्रकारामुळे जर एखाद्या लहान मुलाला त्रास झाला, तर कोण जबाबदारी घेणार? असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR