30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeसोलापूरसोलापूरी कवी कट्टा ग्रुप कडून संध्या धर्माधीकारी यांचा सन्मान

सोलापूरी कवी कट्टा ग्रुप कडून संध्या धर्माधीकारी यांचा सन्मान

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पलूस जि. सांगली यांच्या वतीने ३५ वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनात ग्रामीण कथा लेखिका सौ. संध्या धर्माधिकारी यांच्या रकमा या ग्रामीण कथासंग्रहाला म.भा. भोसले राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार संमेलनाचे उद्घाटन देवदत्त राजोपाध्ये( विटा) यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी जेष्ठ साहित्यिक, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, वासंती मेरु, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पलूस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

संध्या धर्माधिकारी यांच्या रकमा या कथासंग्रहाला यापूर्वी सात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून हा आठवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सोलापूरातील सोलापूरी कवी कट्टा ग्रुप कडून तसेच नरेंद्र गुंडेली,जमालोद्दिन शेख ,मयुरेश कुलकर्णी, वनिता गवळी,स्वाती इराबत्ती, संध्या हेब्बाळकर ,कविता आसादे ,अंजना गायकवाड या मान्यवर साहित्यिकांनी सौ. संध्या धर्माधिकारी यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR