लातूर : प्रतिनिधी
लातूरातील वादग्रस्त व बहुचर्चित डॉ. प्रमोद घुगे व त्याचा भाचा अनिकेत मुंडे याचे विरोधात रुगणाल्यातील कर्मचारी बाळ डोंगरे याचा खुन केल्याचा गुन्हा दाखल असून तो शिवाजीनगर पोलीसांना गुंगारा देत आहे. त्याचा पोलीसांना सुगावा लागत नसतानाच त्यांने अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात दि. १६ डिसेंबर रोजी अर्ज सादर केला असून यावर दि. २० डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
आयकॉन या आपल्याच हॉस्पीटलच्या बाळू डोंगरे नामक कर्मचा-याच्या अपघाताचा बनाव करून हॉस्पीटल मध्येच दि. ११ डिसेंबर रोजी मध्यरात्री हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे किडनी विकार तज्ञ डॉ. प्रमोद घुगे आणि त्याचा भाचा अनिकेत मुंडे बेदम मारहाण करून त्याचा खुन केल्याचा गुन्हा डॉ. प्रमोद घुगे व त्याचा भाचा अनिकेत मुंडे याचे विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून डॉ. प्रमोद घुगे व त्याचा भाचा अनिकेत मुंडे हा फरार झाला आहे. सदरील बाळू डोंगरे आरोपींच्या अटकेसाठी राज्यभर पथके पाठवल्याचा दावा करणा-या शिवाजीनगर पोलिसांना खुनातील मुख्य आरोपी डॉ. प्रमोद घुगे आणि त्याचा भाचा अनिकेत मुंडे पाच दिवसांनंतरही सापडलेला नाही.