लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी मोफत प्रवास बस योजना लातूर शहर बसमध्ये सध्या चालू आहे. शहर बस प्रवास करणा-या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा व त्यांना अधिकाअधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने लातूर शहर महानरपालिकामार्फत महिला शहर बस पास (स्मार्ट कार्ड) योजना चालू करण्यात आली आहे. स्मार्टकार्ड नोंदणी केंद्रात बदल करण्यात आला आहे.
सदर योजनेचा लाभ घेणेसाठी महानगरपालिका हद्दीमधील राहणा-या महिलांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत व सोबत फॉर्म भरून गंजगोलाई शहर बस स्टॉप, क्रिडा संकुल शहर बसस्टॉप, लातूर शहर महानगरपालिका कार्यालय,लातूर, क्षेत्रीय कार्यालय बी ठाकरे चौक, लातूर,क्षेत्रीय कार्यालय सी, डाल्डा
फॅक्ट्री लातूर, क्षेत्रीय कार्यालय अ, मनपा कार्यालय लातूर, क्षेत्रीय कार्यालया ड गांधी चौक,लातूर येथे दिनांक १३/१२/२०२४ पासून रजिस्ट्रेशन चालू करण्यात आले होते.
परंतु महिला प्रवाशांची मागणी लक्षात घेता दिनांक १९/१२/२०२४ पासून खालील ठिकाणी सुधारीत बदल करण्यात आलेला आहे. संविधान चौक, पाण्याची टाकी, बार्शी रोड लातूर, जुना रेणापूर नाका शहर बस थांबा लातूर, गंजगोलाई शहर बस स्टॉप, क्रिडा संकुल शहर बसस्टॉप, लातूर शहर महानगरपालिका कार्यालय,लातूर, क्षेत्रीय कार्यालय बी ठाकरे चौक,लातूर, क्षेत्रीय कार्यालय सी, डाल्डा फॅक्ट्री लातूर येथे देऊन आपले फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून घ्यावे. त्यासाठी लातूर शहर हद्दीत राहणा-या महिलांनी आपल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन फॉर्म भरून आपल्या स्मार्ट कार्ड साठी महिला प्रवाशानी नजीकच्या केंद्रात जावून स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करावी. याची शहर बस मधुन प्रवास करणा-या लातूर शहर महानगरपालिका, लातूर हद्दीतील राहणा-या सर्व महिलांनी नोंद घ्यावी.