25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeअंतरराष्ट्रीयरशियावर ९/११ सारखा हल्ला; युक्रेनचे सतत बॉम्बहल्ले सुरू

रशियावर ९/११ सारखा हल्ला; युक्रेनचे सतत बॉम्बहल्ले सुरू

कजान : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण लढाई सुरु आहे. युक्रेनने रशियावर एक मोठा हल्ला केला आहे. युक्रेनकडून रशियन शहरावर सतत बॉम्ब हल्ले सुरु आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेनने रशियावर मोठे हल्ले सुरु केले आहेत. शनिवारी युक्रेनने रशियावर ९/११ सारखा भीषण हल्ला केला. युक्रेनच्या सैन्याने कजानमधील ६ इमारतींवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर कजानमध्ये एकच गडबड गोंधळ सुरु झाला. हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कजान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आला आहे.

या हल्ल्यांमुळे रशियन नागरिकांना अंडरग्राउंड शेल्टर्समध्ये आसरा घ्यावा लागला आहे. कजानच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी रहाण्यास सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्राया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवले आहे.

या हल्ल्यानंतर रशियातील तातारस्तान रीजनच्या सरकारने पुढच्या दोन दिवसांसाठी राज्यातील सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारने हे पाऊल सुरक्षेच्या कारणास्तव उचलले आहे. या निर्णयावरुन असे दिसते की, रशिया युक्रेनच्या हल्ला करण्याच्या क्षमतेला एक सामान्य घटना मानायला तयार नाही. पुढेही असे हल्ले होऊ शकतात ही भिती आहे. रशियाने पहिल्यापासून सांगितले की, प्रत्येक हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ. आता रशियाची प्रतिक्रिया काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR