23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeपरभणीघरासमोर लावलेली कार चोरट्यांनी पळवली

घरासमोर लावलेली कार चोरट्यांनी पळवली

पूर्णा : शहरातील दुचाकी चोरी नंतर चोरट्यांनी आता आपला मोर्चा चारचाकी वाहनांकडे वळवला आहे. शहरातील एकबाल नगर भागात दि. १८ रोजी मध्यरात्री चारचाकी वाहनातुन आलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी चक्क ुंदाई कारच चोरुन नेल्याची घटना घडली. सदरील घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पूर्णा शहरातील एकबाल नगर भागात राहणारे अब्दुल निसार व अन्सार त्यांची ुंदाई कंपनीची एम.एच. ०२ ईयु ८७५८ दि. १८ रोजी आपल्या घरासमोर पार्क करून जेवण करुन झोपी गेले होते. मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास घरासमोर लावलेली कार एका पांढ-या रंगाच्या कारमधुन आलेल्या दोन ते तीन चोरट्यांनी अत्यंत शिताफीने कारचे लॉकतोडून पळवून नेली आहे. दरम्यान ही घटना त्यांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर लक्षात आली. या प्रकरणी पूर्णा पोलीसांना त्यांनी खबर दिली आहे. चारचाकी वाहनांची चोरी होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शहरात रात्र गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR