परभणी : मेडिटेरियन सोसायटी ऑफ पेल्व्हिक फलोअर डिसऑर्डर (एमएसपीएफडी) आणि इजिप्शिअन सोसायटरी ऑफ कोलॉन अँन्ड रेक्टम (इएससीआर) ची १९वी वार्षिक परिषद इजिप्त येथील कैरो याठिकाणी दि. १० ते १२ एप्रिल २०२५ या काळात आयोजीत केली आहे. भारतातील निवडक डॉक्टरांची या परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. यात परभणी येथील प्रसिध्द मुळव्याध तज्ञ डॉ. आनंद कुलकर्णी उंडेगावकर यांच्या शोध प्रबंधाची निवड झाली आहे.
या परिषदेत कॉम्प्लेक्स फिशुला इन टू सिंपल फिशुला इन अॅनो (इफटॅक) या विषयावर परभणी येथील प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ.आनंद कुलकर्णी उंडेगावकर हे शोध प्रबंध सादर करणार आहेत. यापूर्वी डॉ. उंडेगावकर यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुळव्याध परिषदेत सहभाग नोंदवला आहे. मागील २३ वर्षापासून परभणीत स्वास्थ्य मुळव्याध हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. उंडेगावकर हे मुळव्याध जनजागृतीचे काम करत आहेत. कैरो इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांच्या शोध प्रबंधाची निवड झाल्याने या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.