27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीचे खातेवाटप जाहीर

महायुतीचे खातेवाटप जाहीर

गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे तर अर्थ अजित पवारांची जबाबदारी

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतर प्रतीक्षा होती ती खातेवाटपाची ती अखेर पूर्ण झाली असून महायुती सरकारमध्ये शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी खातेवाटप झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खाते ठेवले आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्कची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागची जबाबदारी देण्यात आली आहे.

१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेली सर्वच खाते
२. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
३. उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
कॅबिनेट मंत्री
१.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
२.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
३.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
४.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
५.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
६.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
७.गणेश नाईक – वन
८.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
९.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
१०.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
११.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
१२.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
१३.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
१४.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
१५.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
१६.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
१७.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंर्त्य सैनिक कल्याण मंत्रालय
१८.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
१९.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
२०.अदिती तटकरे – महिला व बालविकास
२१.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
२२.माणिकराव कोकाटे – कृषी
२३.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
२४.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
२५.संजय सावकारे – कापड
२६.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
२७.प्रताप सरनाईक – वाहतूक
२८.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
२९.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
३०.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
३१.आकाश फुंडकर – कामगार
३२.बाबासाहेब पाटील – सहकार
३३.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
३४. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
३५. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
३६. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
३७. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
३८. योगेश कदम – गृहराज्य शहर
३९. पंकज भोयर – गृहनिर्माण

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR