20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूरबाजारपेठेत भाजीपाल्याचे दर स्थिरावले

बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर स्थिरावले

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत गत दोन अठवडयापासून भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात स्थिरावले आहेत. नोव्हेंबरमध्ये चडलेल्या भाजीपाल्याचे दर काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे सामान्य नागरीकांना दिलासा मिळत आहे.
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत गेल्या महिभरापुर्वी भाजीपाल्यासह पालेभाज्यांची आवक मंदावली असल्याने किरकोळ  बाजारात मात्र भाजीपाल्याचे तेजीत होते. सध्या बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर झाल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी सागीतले.सध्या बाजारपेठेत येनारी सर्वत्र भाजीपाल्याची आवक चागल्याप्रतीची होत आहे. जिल्ह्यात गतवर्षाच्या तूलनेत यंदा पाउस चागल्या प्रमाणात झाल्याने शेतक-यांने भाजीपाल्यासह पालेभाज्यांची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली आहे.
त्यामुळे येणा-या काही दिवसात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार असून दर काही प्रमाणात घसरण्याचा अंदाज किरकोळ व होलसेल व्यापारी गुरूनाथ गोउबोले यांनी व्यक्त केला. सध्या सर्वत्र थंडीमुळे पोषक वातावरण असल्याने बाजार समितीत पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे मेथी, पालक, शेपू या पालेभाज्यांच्या जुडीचे भाव आवाक्यात आले आहेत. यामुळे पालेभाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पालेभाज्यांचे भाव चांगलेच वाढले होते. त्यामुळे पालेभाज्यांचे खरेदी कमी झाली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यासह शेजार जिल्ह्यातून भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर स्थिरावले आहेत.
बाजारात मेथी, पालक, शेपू, कांदा पात या भाज्या १० रुपयांना मिळत आहेत. याबरोबरच इतर पालेभाज्यांना ग्राहकांकडून मागणीही वाढली आहे. पालेभाज्यांबरोबर भाज्यांचेही भाव उतरत आहेत. वांगे, भेंडी, कोबी, वरणा, काकडी, भोपळा यासह अन्य कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे ३० ते ४० रुपये प्रतिकिलोच्या दरात आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचे भावही आटोक्यात
आले असल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी एकमतशी बोलताना सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR