परभणी / प्रतिनिधी
दलित युवक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याला आरएसएसची विचाराधा जबाबदार असल्याचे मत काँग्रेसचे विराधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी स्व. सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, युवक दलित आहे म्हणून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात विधीमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णत: खोटी असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेते कोणतेही राजकारण नाही. सोमनाथ सुयर्वशंी या युवकाची पोलिसांनी केलेल्या मारहाणीत हत्या झाली असुन यास जबाबदार असणा-या मुख्यमंत्री व संबंधीत पोलिसांवर कारवाई करून न्याय दिला पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच घटनेला जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथला, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नितीन राऊत, खासदार वर्षा गायकवाड, श्रीमती यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.