23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीय‘मेरा राशन २.०’ अ‍ॅपवरूनच मिळणार आता रेशन

‘मेरा राशन २.०’ अ‍ॅपवरूनच मिळणार आता रेशन

रेशनकार्डशिवाय स्वस्त धान्याचे वितरण होणार सरकारकडून नियमात मोठा बदल

नवी दिल्ली : सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. डिजिटल पद्धतीने रेशन कार्डशिवाय लोकांना सेवांना लाभ घेता येणार आहे.

सरकारने रेशन मिळवण्यासाठी अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मेरा राशन २.०’ हे अ‍ॅप वापरून तुम्ही तुमचे रेशन मिळवू शकता. म्हणजेच आता लोकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका अ‍ॅपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल. केंद्र सरकार दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन २.० अ‍ॅपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे. भारत सरकारच्या या अ‍ॅपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरत राहतात. या अ‍ॅपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचे रेशन सहज मिळू शकेल. या अ‍ॅपमुळे रेशन घेण्यासाठी प्रत्येक वेळी रेशनकार्ड बाळगण्याची गरज दूर होणार आहे.

रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेकवेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फे-या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता. तसेच तुम्हाला तुमचे नाव रेशनकार्डमधून काढायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. याबाबत सरकारने एक मोबाईल अ‍ॅप लाँच केले असून त्याद्वारे रेशन कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे.

मेरा राशन अ‍ॅप २.० कसे वापरावे?
– सर्वप्रथम तुम्हाला हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.
– गुगुल प्ले स्टोअर्स अ‍ॅप किंवा अ‍ॅपल स्टोर्सवरून मेरा राशन २.० अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
– मेरा राशन २.० अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
– ओटीपी पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी भरा.
– या स्टेप्सनंतर तुमच्या रेशनकार्डची डिजिटल कॉपी ओपन होईल. ही प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?
नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR