18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeपरभणीगझल यात्री पुरस्कार गझलकार दिवाकर जोशी यांना प्रदान

गझल यात्री पुरस्कार गझलकार दिवाकर जोशी यांना प्रदान

सेलू : नाना बेरगुडे स्मृती समिती सेलूच्या वतीने दिल्या जाणारा गझल यात्री पुरस्काराचे वितरण प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांच्या हस्ते गझलकार दिवाकर जोशी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात दि.२१ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व जेष्ठ साहित्यिक दगडू दादा लोमटे होते. याप्रसंगी बोलताना डॉ कोठेकर यांनी गझल या प्रकारातील मराठीतील प्रारंभाच्या गझलकारापासून ते सुरेश भट व आजच्या गझलकार यांच्या पर्यंतच्या गझल लिखाणाची विस्तृत माहिती विषद केली व म्हणाले की सज्जन माणसाच्या नावाचा हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अध्यक्ष समारोपात ज्येष्ठ साहित्यिक दगडू दादा लोमटे म्हणाले की, आंबेजोगाई आणि सेलूचे तसे पूर्वीपासूनचे एक भावनिक नाते असून शैक्षणिक व सामाजिक वारसा जपलेला आहे. नाना बेरगुडे यांनी ताकदीच्या गझल लिहिलेल्या आहेत. त्यातूनच त्यांचं जगणं प्रेरणा देत असे ते म्हणाले.

याप्रसंगी नाना बेरगुडे स्मृती समिती सेलूचे अध्यक्ष संजय विटेकर व सौ अश्विनी विटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत परळी येथील गझलकार दिवाकर जोशी यांना गझल यात्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवर गझलकारांनी आपापल्या उत्कृष्ट गझल सादर केल्या. त्यांना रसिक मान्यवरांनी चांगलीच दाद दिली.

उपस्थित मान्यवर गझलकारांचे स्वागत रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, भालचंद्र कोठेकर, मोहन खापरखुंटीकर, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महादेव आगजाळ, अजित मंडलिक, गंगाधर गुंजकर, आनंद बाहेती, अजित मंडलिक, प्रवीण मानकेश्वर आदींनी प्रयत्न केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR