18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeसोलापूररुग्णांनी कोणताही आजार अंगावर काढू नये : डॉ. नवले

रुग्णांनी कोणताही आजार अंगावर काढू नये : डॉ. नवले

सोलापुर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेसाठी शासनाकडून पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची शंभर टक्के पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचार घेण्यासाठी रुग्णांचा ओढा अधिक आहेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय सेवेत सुधारणा करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही आजार अंगावर काढू नये.

नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात ७७ आरोग्य केंद्रातून बा व आंतर रुग्णावर उपचार केले जातात. ग्रामीण भागातील रुग्णांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याकडे कल वाढत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत ८ लाख ७९ हजार ८७६ बा रुग्णांवर तर १८ हजार १५१ आंतर रुग्ण अशा एकूण ८ लाख ९८ हजार २७ रुग्णांवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना केस पेपरचीही फी न घेण्याचे आदेश काढले होतेत्या आदेशाची अंमलबजावणी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जात आहे.

आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक बरोबरच प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासह गरोदर माता व बालकांचे लसीकरण केले जाते.यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी हे पद शासन पातळीवरून भरण्यात येत होते. मात्र त्यात दुरुस्ती करून जिल्हा परिषदेकडे आरोग्य अधिकारी हे पद भरण्याचा अधिकार शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीला दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे १६९ आरोग्य अधिकारी पदाची पदे मंजूर आहेत ही सर्व पदे शासन नियमानुसार भरण्यात आली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर होऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR