हैदराबाद : पुष्पा २ फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून सुपरस्टार अल्लु अर्जुन विवादात सापडला आहे. आता अल्लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थेएटर चेंगराचेंगरी प्रकरणी मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी चौकशीसाठी समन्स जारी केले होते.
पुष्पा २ च्या प्रीमियरच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला होता. तर तीचा मुलगाही गंभीर जखमी झाला होता. या ८ वर्षीय मुलाला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी अल्लु अर्जुनला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली होती.
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तोडफोडीच्या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता. या प्रकरणी अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांकडून आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा असल्याचे जुबली हिल्स पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
उस्मानिया विद्यापीठातील पदाधिका-यांनी अल्लू अर्जुन नेत्यांनी अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) आठ सदस्यांना अटक केली. त्यांना ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान अल्लू अर्जुनच्या घरात तोडफोडीचा व्हीडीओ सोशल मीडिया व्यहायल झाला आहे. यामध्ये काही जण घराच्या कंपाऊंडमधील कुंड्या फोडल्याचे दिसत आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.