करौली : राजस्थानच्या करौली-गंगापूर रस्त्यावरील सालेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला असून येथे खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणारे लोक कैला देवी मातेच्या दर्शनासाठी गेले होते, तेथून परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये इंदूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना आणि एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय घटनास्थळी पोहोचले. या अपघातात नयन देशमुख, प्रीती भट्ट, मानसबी देशमुख, खुशबू देशमुख, अनिता देशमुख यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह चार जण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. ते गुजरातमधील वडोदरा येथे राहत होता. पोलिस प्रशासनाने या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली आहे. या प्रकरणाचा तपास कुरगाव पोलिस करत आहेत.