टोकियो : गुरुवारी पहाटे जपान एअर लाईनवर गुरुवारी सायबर हल्ला झाला असून हा सायबर हल्ला एअरलाइन्सच्या सर्व्हरवर झाला. यानंतर जपान एअरलाइन्सने तिकिटांची विक्री बंद केली आहे. सायबर हल्ल्यांमुळे काही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना उशीर होऊ शकतो, असे जपान एअरलाइन्सने सांगितले. सिस्टममध्ये बिघाड झाल्याने राउटर तात्पुरते बंद केले आहे.
याशिवाय गुरुवारी सुटणा-या विमानांच्या तिकिटांची विक्रीही बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.२४ वाजता हा सायबर हल्ला झाला. याचा परिणाम कंपनीच्या अंतर्गत आणि बा दोन्ही प्रणालींवर झाला आहे. आम्ही या परिस्थितीचे गांभीर्य आहे. सिस्टीमला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत असे जपान एअर लाईन्सकडून सांगण्यात येत आहे. एएनए होल्डिंग्ज या जपानी विमान कंपनीने सांगितले की, सिस्टमवर सायबर हल्ल्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि आमच्या सेवा सुरळीतपणे कार्यरत आहेत. एएनए होल्डिंग्ज ही जपान एअरलाइन्सची प्रतिस्पर्धी मानली जाते. ख्रिसमसच्या आधी, अमेरिकन एअरलाइन्सच्या नेटवर्क हार्डवेअरमध्ये तांत्रिक समस्येमुळे एका तासासाठी सर्व उड्डाणे ग्राउंड करण्यात आली. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.
विमान कंपन्यांवर सायबर हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. यापूर्वी २०२२ मध्ये रॅन्समवेअर ऑपरेटर ग्रुप डिक्सिन टीमने एअर एशियाच्या ५० लाख प्रवाशांचा डेटा चोरल्याचा दावा केला होता. एअर एशिया ही मलेशियाची प्रसिद्ध विमान कंपनी आहे. २०२३ मध्ये स्वीडिश विमान कंपनी स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला होता.