20.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयकॉलिंग, एसएमएससाठी आता वेगळे प्लॅन

कॉलिंग, एसएमएससाठी आता वेगळे प्लॅन

‘ट्राय’चा मोठा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांचे वाचणार पैसे, कंपन्यांकडून होणारी लूट थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय दूरसंचार कंपन्यांकडून दिले जाणारे सर्व रिचार्ज योजनांमध्ये इंटरनेट किंवा डेटा दिला जात आहे. ब-याचदा वापरकर्त्यांना डेटाची आवश्यकता नसते आणि तरीही अशा योजनांसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. इतकेच नाही तर वयस्कर आणि ग्रामीण भागातील वापरकर्ते त्यांच्या फोनवर इंटरनेट वापरत नाहीत, त्यांनादेखील मोबाइल सेवा सुरू ठेवण्यासाठी महागडे रिचार्ज करावे लागतात. अशा देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांची सोय म्हणून आता त्यांना कॉलिंग आणि एसएमएससाठी वेगळा प्लॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांच्या वाढीव खर्चात बचत होणार आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाइल ऑपरेटर्सना फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देणा-या रिचार्ज योजना सुरू करणे अनिवार्य केले आहे. या योजना इंटरनेट डेटा एकत्रित करून देऊ नयेत, असेही ट्रायने म्हटले आहे. मोबाइल ऑपरेटर हे व्हाईस आणि एसएमएस संबंधित बहुतांश योजनांबरोबर इंटरनेट किंवा डेटा प्लॅन्सच्या किंमती एकत्रित करून योजना देत आहेत. यामुळे महिन्याच्या प्लॅनची किंमत सामान्य वापरकर्त्यांसाठी खूप जास्त होत आहे.

दरम्यान, आता ट्रायने यामध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच ट्रायच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेची गती कमी होईल, असा युक्तीवाद मोबाइल कंपन्यांनी केला आहे. सध्याच्या डेटा-ओनली एसटीव्ही आणि बंडल ऑफर व्यतिरिक्त व्हॉइस आणि एसएमएससाठी एक वेगळा एसटीव्ही (स्पेशल टेरिफ व्हाऊचर) अनिवार्य केले पाहिजे. त्यातच व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली अनिवार्य केल्याने ज्यांना डाटा किंवा इंटरनेटची आवश्यकता नाही, त्या ग्राहकांना पर्याय मिळेल.

यामुळे सरकारची डेटा एनक्लूजन मोहीमदेखील प्रभावित होणार नाही. कारण दूरसंचार कंपन्या ग्राहकांना बंडल ऑफर आणि डाटा ओन्ली व्हाउचर देण्याचे स्वातंत्र्य असेल, असेही ट्रायचे म्हणणे आहे. व्हॉइस-एसएमएस योजना त्या वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करतील जे फक्त व्हॉइस कम्युनिकेशनला प्राधान्य देतात. यामध्ये त्यांना डेटा सेवा वगळल्याने स्वस्त सेवा मिळेल. यातून ग्राहकही समाधानी होतील, असेही ट्रायचे म्हणणे आहे.

१५ कोटी ग्राहकांना हवा व्हाईस कॉल, एसएमएस
सप्टेंबर-नोव्हेंबर २०२२ कालावधीत ग्राहकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला होता. यामुळे दूरसंचार ऑपरेटर्स, ग्राहक आणि इतरांसोबत चर्चा केल्यानंतर यासंबंधी एक पत्र जारी करण्यात आले होते. तब्बल १५ कोटी ग्राहक अजूनही फीचर फोनचा वापर करतात. या वापरकर्त्यांची मूलभूत गरज ही व्हॉइस आणि एसएमएस सेवा हीच असते, असेही ट्रायने नमूद केले आहे.

ग्राहकांना निवडण्याचा अधिकार असायला हवा
ग्राहकांना निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. यामुळे व्हॉइस केंद्रित वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करणे, परवडणा-या योजना, फ्लेक्सिबिलिटी आणि कस्टमायजेशन यासह मार्केट सेगमेंटेशन यासारख्या विविध बाबींमध्ये मदत मिळेल. माहितीच्या अभावामुळे, विशेषत: ग्रामीण भागात वृद्ध लोक डेटा सेवा वापरण्यास कमी इच्छुक असतात, असेही ट्रायने म्हटले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR