28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeलातूरजखमी विद्यार्थ्यांचा पावणे दोनशे कि. मी. प्रवास

जखमी विद्यार्थ्यांचा पावणे दोनशे कि. मी. प्रवास

लातूर : प्रतिनिधी
नागपूर रत्नागिरी-राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणा-या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील श्री गणेश विद्यालयाच्या सहल बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होवून  बसमधील ४० विद्यार्थी व ८ शिक्षक व दोन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवेढापासून तीन किलोमीटर अंतरावर घडली. विशेष म्हणजे जखमी ४० विद्यार्थ्यांवर मंगळवेढा येथील शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जखमी अवस्थेत लातूरातील विलासराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने शालेय प्रशासना विरोधात आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
लातूर जिल्ह्यातील श्री गणेश विद्यालय शिवनखेड (बु.) माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस एम. एच. २४ एबी ७२८१ ही ४० विद्यार्थी व आठ शिक्षक यांना घेऊन बुधवार दि. २६ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता विद्यालयातून कोल्हापूर कडे जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला, दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली बस खड्डयात पडली सदर बसमध्ये ४० विद्यार्थी व ८ शिक्षक २ चालक होते असे समजते.
यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली असून १०८ रूग्णवाहिकेचे डॉ. प्रज्योत पाटील व चालक गौसपाक आतार यांनी तातडीचे सहकार्य केले.१०८ अ‍ॅम्बुलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलवण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. वैभव जांगळे व चालक दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया यांची अ‍ॅम्बुलन्स १०३३ चे ड्रायव्हर व सुपरवायझर यांनी तातडीची घटनास्थळ गाठून मदत कार्य करून जखमीं ४० विद्यार्थी ८ शिक्षक व दोन चालकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धाव घेऊन जखमींसाठी वैदयकिय यंत्रणा सतर्क ठेवत रात्र पाळीतील  आर. बी.एस. के चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने, आयुष डॉ. निखिल जोशी, आर.बी. एस. के चे डॉ. कुलकर्णी व परिचारिका वैशाली शिंदे, शितल कपाटे, सानिका गायकवाड, सुनिता जाधव व चनशेट्टी यांनी सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले. त्यामध्ये दोन विद्यार्थी चालक यांना हाडाची दुखापत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना जानकर यांच्याकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे मंगळवेढा येथे प्रायमिक उपचार घेत शालेय प्रशासनाने जखमी ४० विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेत लातूरातील विलासराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात गुरूवारी सकाळी १० वाजनेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने शालेय प्रशासना विरोधात आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR