31 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयऐक्याला सुरुंग लागतोय

ऐक्याला सुरुंग लागतोय

आप आक्रमक

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते काँग्रेस आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेसमुळे इंडिया आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लागत असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपच्या इशा-यावर विधाने करतात आणि भाजपाच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात. काल त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले, अशी टीका संजय सिंह यानी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR