22.6 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रपरभणीतील पीडित सूर्यवंशी कुटुंबाला १ कोटीची भरपाई द्या

परभणीतील पीडित सूर्यवंशी कुटुंबाला १ कोटीची भरपाई द्या

प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी अशा मागण्या या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी केल्या आहेत. परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परभणी प्रकरण तसेच इतर बाबतीत चर्चा केली. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या. परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा, अशा मागण्या या वेळी आंबेडकर यांनी केल्या.

भीमा-कोरेगाव सोहळ्याआधी खबरदारी घ्या
येत्या १ जानेवारी रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे अभिवादन सोहळा असणार आहे. या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती देऊन जनमानस भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR