28.7 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरपोलिसांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही

पोलिसांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही

संतोष देशमुखांच्या बहिणीचा जळजळीत सवाल

बीड : पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती सध्या कुठाय? शंभरपेक्षा जास्त पोलिस तपास करत आहेत, असे म्हणता तर फरारी आरोपींना लवकरात लवकर का पकडले जात नाही. कारण, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेला बावीस दिवस झाले आहेत. फरारी आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. पण, ते काय करताहेत, हेच कळत नाही, असे सवाल संतोष देशमुख यांच्या बहिणीने उपस्थित केले आहेत.

खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा आज पुण्यात सीआयडी पोलिसांना स्वत:हून शरण आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या संथ गतीच्या तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR