38.9 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeलातूरहिवाळ्यात गरमागरम चहाचा घोट महागला

हिवाळ्यात गरमागरम चहाचा घोट महागला

लातूर : सिद्धेश्वर दाताळ
मागील सहा वर्षांत चहाचे दर वाढले नसले तरी यंदा गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला आहे. गॅस सिलिंडर पाठोपाठ दुधाच्या भाववाढीमुळे चहावाल्यांनीसुद्धा भाववाढ केल्याने एक कट चहामागे तब्बल दोन ते तीन रुपयांची वाढ चहा विक्रेत्याने केली आहे. मागील वर्षभरातील ही पहिलीच वाढ असल्याचे चहा विक्रेत्यांकडून केला जात आहे.
त्यातच, वेगवेगळया नावाने ब्रॅण्डिंग सुरु केलेल्या अमृततुल्य चहाच्या दुकांनावर एका कटसाठी दहा रुपये मोजणा-यांची गर्दी दिसते. त्यामुळे महागाई आणि आर्थिकमंदीतही चहाचे मार्केट मात्र गरमच दिसत आहे. चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. चहा विक्री करणा-या एका कंपनीचे हे वाक्य भारतीयांसाठी चहा किती प्रेमाचा आहे, याची प्रचिती देते. म्हणूनच लातूर शहरात नाक्यानाक्यावर चहाच्या टप-या दिसतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच चहाची गोडी आहे. त्यामुळे या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. देशात आर्थिकमंदी असो वा महागाई, चहाच्या व्यवसायावर फारसा परिणाम दिसत नाही. पूर्वी ज्या चहाची कटिंग अवघ्या पन्नास पैशाला मिळायची, ती आता दहा रुपयांवर पोहोचली आहे. तरीही चहाचे चाहते कमी झालेले नाहीत.  कडक उन्हाळा असो, पावसाळा असो, वा हिवाळा, लोकांना चहा हवाच असतो. म्हणूनच रस्त्यावरची ही लहान इंडस्ट्री दिवसेंदिवस फुलतच आहे. सध्या या इंडस्ट्रीला गॅस आणि दुधाच्या भावाढीचे ग्रहण लागले आहे. गेल्या सहा महिन्यांत गॅसच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
 एक वर्षापूर्वी जे गॅस सिलिंडर ५०० ते ७०० रुपयांना मिळत होते, ते आता १००० ते १२०० रुपयांना मिळत आहे. जे दूध एक वर्षापूर्वी  ४० ते ४५ रुपये लिटरने मिळत होते, ते आता ६० ते ७० रुपये लिटरने मिळत आहे. दूध आणि गॅसचा भाव सहा वर्षांत अनेकदा वाढला. परंतु चहाच्या कटिंगचा भाव वाढला नव्हता. आता मात्र भाववाढ करणे अपरिहार्य झाल्याचे कारण पुढे करत विक्रीत्यांनी कटिंगमागे दासेन ते तीन रूपयांची वाढ केली असल्याचे शहरातील एका ब्रॅण्ड चहा विक्रेत्यांने सागीतले.  गेल्या सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरचे भाव सतत वाढत आहेत. तरीही चहाच्या भावात वाढ झालेली नव्हती. मात्र आता गॅस आणि दुधाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याने चहाच्या किमतीत वाढ करावी लागली असल्याचे शंकर यादव चहा विक्रेता यांने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR