16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्याच्या पालकमंत्रिपदावरून शीतयुद्ध!

पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून शीतयुद्ध!

पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल : मुरलीधर मोहोळ

पुणे : प्रतिनिधी
पुण्याचा पालकमंत्री भाजपाचा की अजित पवार गटाचा यावरून सध्या दोन्ही पक्षांत शीतयुद्ध सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत कोणताही वाद नाही. आम्ही निवडणूक एकत्रित लढलो असून, कार्यकर्त्यांत समजदेखील आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व जे निर्णय घेते, त्याची अंमलबजावणी करतात. मनपा निवडणुकीच्या जागांबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल.

पुण्यातील भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले दाम्पत्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोहोळ म्हणाले, देशातून दरवर्षी सव्वादोन कोटी भाविक शिर्डीला येतात. परंतु त्याठिकाणी विमानसेवा २४ तास सुरू नाही.

सीआयएसएफ, एटीसी मनुष्यबळाचा विषय होता, त्यामुळे त्याबाबत मी बैठक घेऊन दोन ते तीन महिन्यांत सर्व प्रश्न मार्गी लागतील. तीन महिन्यांनंतर शिडींचे विमानतळ २४ तास सुरू राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दावे, प्रतिदावे
पुण्याच्या पालकमंत्रिपदावर अजित पवार गटाचा दावा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पालकमंत्री होतील, असा दावा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार जास्त असल्याने तेदेखील पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे थेट दावा करण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांवर हा विषय सोपवत आहेत. सध्यातरी पालकमंत्रिपदावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

पुरंदर विमानतळासाठी मुंबईत होणार बैठक
पुरंदर विमानतळाबाबत जागा निश्चित झाली आहे. रविवारी राज्यातील सर्व विमानतळांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांचीदेखील बैठक मुंबईत होणार असून, त्यात पुण्यातील पुरंदर विमानतळाचा प्रश्न असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR