17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeपरभणीधनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही

धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही

तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता मनोज जरांगेंनी मुंडेंविरोधात थोपटले दंड

परभणी : संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना पोलिस टाण्यात गेल्यानंतर धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा उल्लेख करत मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटले. यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. परभणीत बोलताना मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेऊन निशाणा साधला.

धनंजय देशमुख हे ज्यावेळी पोलिस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली. मी आतापर्यंत कधी नाव घेऊन बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे की, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कुणाच्या वाट्याला जात नाही. पण, यापुढे आमचे संतोष भैय्या तर आता गेलेत… पण यापुढे त्यांचे कुटुंबीय, धनंजय देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

मनोज जरांगे म्हणाले, आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. या मुंड्याचे आम्ही नावही घेतले नाही. पण, यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना यापुढे त्रास झाला, तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आपल्या समाजाला त्रास झाला, तर यांना घरात घुसून मारायचे. मी असले कधी बोलत नाही. पण, माणसांचे मडदे पडायला लागले, तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये. आम्हाला मस्ती पण नाहीये, पण जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावर पाडायला लागलात, तर… आज त्या कुटुंबाची काय अवस्था आहे. तुम्ही लोक मारून जर आरोपी घरात लपून ठेवता. पुण्यात यांना सांभाळले कुणी? सगळे आरोपी पुण्यात कसे सापडू लागलेत? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री त्या आरोपींना सांभाळायला लागले आहेत, असे म्हणत मनोज जरांगेंनी आरोपींच्या पुण्यातील ठिकाणाबद्दल संशय व्यक्त केला.

या खंडणीतील आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांना सांभाळणा-या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे. आरोपपत्र जर कच्चे झाले. सरकारचे ऐकून आणि तिथल्या मंत्र्यांचे ऐकून जर चार्जशीट कच्चे झाले आणि त्यातील एक जरी आरोपी बाहेर आला की, मंत्री गोट्यांनी (दगड) हाणलाच. तुम्हाला आता हीच भाषा कळते असा घणाघात मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR