राज्यातले सारे भिकारी शिर्डीत, साई मंदिरातील प्रसादालयातील जेवण बंद करा

शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिका-­यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरम्यान, साई संस्थानच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही, असेही सुजय विखे म्हणाले.

इंग्लिश विषय शिकवणा-यालाच इंग्रजी येत नाही
आंदोलनाची वेळ आली तरी चालेल यासाठी आम्ही आंदोलन करू असा इशारा सुजय विखेंनी साई संस्थानला दिला आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले. मात्र चांगले शिक्षक तेथे नाहीत. इंग्लिश विषय शिकवणा-यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय, याचा काय उपयोग? असे म्हणत सुजय विखेंनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर ताशेरे ओढले आहेत. शिर्डीतील शिर्डी परिक्रमा उद्घोषणा कार्यक्रमात सुजय विखे पाटलांनी भोजनालयात दर आकारावे अशी मागणी केली आहे. यावर निर्णय झाला नाही आणि आंदोलनाची वेळ आली तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विखे पाटलांनी माफी मागावी- अक्षय महाराज भोसले
शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. मात्र आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असे संबोधन करणे हे दुर्दैवी आहे. कारण अन्नदान क्षेत्रात सर्वसामान्य सगळेच प्रसाद घेत असतात, असे म्हणत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news