17.8 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाक क्रिकेट संघ १२ रोजी भिडणार!

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाक क्रिकेट संघ १२ रोजी भिडणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डीसीसीआय अर्थात भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेच्या निवड समितीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने श्रीलंकेत १२ ते २१ जानेवारी दरम्यान होणा-या या स्पर्धेसाठी मुख्य संघात एकूण १७ खेळाडूंना संधी दिली आहे. तर ३ खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश केला आहे. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचं २०१९ नंतर पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं आहे.

टीम इंडिया या स्पर्धेत एकूण ६ सामने खेळणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी २-२ सामने खेळणार आहे. विक्रांत रवींद्र केणी हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया १२ जानेवारीपासून चॅम्पिन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सा-यांचे लक्ष असणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र
राखीव खेळाडू : जसवंत सिंग, सादीक आणि जीएस शिवशंकरा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR