20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeसोलापूरविद्यार्थी हितासाठी शिक्षकांच्या हातातील मोबाईल काढा

विद्यार्थी हितासाठी शिक्षकांच्या हातातील मोबाईल काढा

सोलापूर—ऑनलाईन व शाळाबा कामसाठी शिक्षकांना वारंवार हातात मोबाईल घ्यावे लागत आहे.हा मोबाईल शिक्षकांच्या हातातुन काढायचा असेल तर सर्व प्रकारची ऑनलाईन व शाळा बा कामे व सर्व सर्व्हेक्षणाचे काम रद्द करा अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसह सर्व स्वायत्त संस्थेतील शिक्षकांच्या हातातील मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळा आणणारा ठरत आहे. शिक्षकांना वारंवार भराव्या लागत असलेल्या सर्व प्रकाच्या ऑनलाईन लिंक पुर्णपणे बंद करण्यात याव्यात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर शिक्षकांच्या हातात असलेला मोबाईल शालेय वेळात पुर्णपणे काढणे गरजेचे आहे.तसेच शासन स्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या माहीती भरणाऱ्या लिंक पुर्णपणे बंद केल्या पाहीजेत.तसेच शासनात राबवित असलेले वेगवेगळ्या उपक्रमाचे आठवडे,पंधरवाडे, दिवस बंद करणे गरजेचे आहे.त्यात वारंवार ऑनलाईन लिंक भरणे ,व्हिडीओ अपलोड करणे ,फोटो अपलोड करणे या बाबी पुर्णपणे थांबवणे गरजेचे आहे.कारण हे आठवडे व पंधरवाडे, दिवस राबविणे यातच शिक्षकांचा सर्व वेळ निघुन जात आहे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच शाळा सुरु झाल्यानंतर पायभुत चाचणी सह इतर अंवातर होणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्या थांबवुन महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेला अभ्यासक्रमच राबविण्याची व त्याच्याच मुल्यमापन करणाऱ्या चाचण्या घेण्यात याव्यात, या व्यतिरिक्त इतर कोणत्याही चाचण्या घेण्यात येऊ नयेत तसेच शिक्षकांची सर्व शाळाबा कामे काढण्यात यावित,सर्व प्रकारची सर्वेक्षणे रद्द करण्यात यावीत,बी.एल. ओ चे काम तात्काळ रद्द करण्यात यावे,शिक्षकांना फक्त निवडणुक व जणगनना याशिवाय कोणत्याही प्रकराचे सर्वेक्षणाचे काम देण्यात येऊ नयेत.शिक्षकांना १५१ प्रकारची कामे करावी लागतात,ती सर्व रद्द करुन फक्त आणि फक्त शिकवण्याचेच काम देण्यात यावे .

शिक्षणामध्ये विद्यार्थी व शिक्षक हे दोन घटक खुप महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही घटक पुर्णपणे एकमेकांवर अवलंबुन आहेत.शिक्षकांवरचा ऑनलाईन कामाचा व शाळाबा कामाचा ताण कमी केला तर ते विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊ शकतील अन्यथा शिक्षणाचा होत असलेला हा खेळखंडोबा कधीही कमी होणार नाही. शिक्षकांची सर्व प्रकारची ऑनलाईन, लिंक भरण्याची कामे व शाळाबा कामे पुर्ण पणे बंद करुन फक्त शिकवण्याचे काम करु द्यावे आशी मागणी त्यांनी केली. तसेच उल्हास अ‍ॅप, स्विटचॅट अ‍ॅप,ओटर अ‍ॅप आशा सर्व अँपवरचे काम शिक्षका कडुन करुन घेणे पुर्ण पणे बंद करण्यात अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टिईटी परीक्षा उत्तीर्ण ची अट रद्द करावी या सह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड , राज्य सचिव निलेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष मनोज कोरडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR